मावळमधून खासदार श्रीरंग बारणे विरूद्ध संजोग वाघेरे पाटील यांच्यात होणार लढत

प्रभात पर्व न्यूज - Published: 28-Mar-2024 08:02 pm

मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे मावळमधून श्रीरंग बारणे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात लढत होणार आहे. शिवसेनेते फूट पडल्यानंतर मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे मावळमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार हे निश्चित मानले जात होते. दोन्ही शिवसेनेकडून आपापले उमेदवार जाहीर झाल्याने मावळमधून महायुतीकडून श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

      पुणे आणि रायगड जिल्हा मिळून २००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेने विजय मिळविला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने युती धर्माचे पालन केल्यामुळे सेनेला यश प्राप्त झाले आहे. मात्र शिवसेनेतच फूट पडली आहे. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट समोरासमोर उभे ठाकले आहे.

        मतदारसंघाच्या स्थापनेनंतर लोकसभेच्या तीन निवडणुका झाल्या. यापैकी २००९मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आझमभाई पानसरे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये बाबर यांना तीन लाख ६४ हजार ८५७ मते मिळाली. तर, पानसरे यांना दोन लाख ८४ हजार २३८ मते मिळाली होती. सन २०१४च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना पाच लाख १२ हजार २२३ मते, शेकाप पुरस्कृत लक्ष्मण जगताप यांना तीन लाख ५४ हजार ८२९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना एक लाख ८२ हजार २९३ मते मिळाली होती. गेल्या २०१९च्या निवडणुकीत राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार रिंगणात होते. त्यामुळे प्रचारात चुरस पहावयास मिळाली. परंतु, बारणे यांनी सात लाख २० हजार ६६३ मते मिळवून सहज विजय मिळविला. तर, पार्थ पवार यांना पाच लाख ४ हजार ७५० मतांवर समाधान मानावे लागले. गेल्या तीन निवडणुकीत मावळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. पण, शिवसेनेत फूट पडल्यापासून मावळमध्येही ठाकरे गट आणि शिंदे गटात सामना आहे. येथून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना हॅट्‌ट्रिक करायला मिळणार की नाही, हे पाहावं लागणार आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement