पनवेलमधील ग्रामीण भागात ईशान्‍य फाऊंडेशनकडून मोबाईल क्लिनिक आणि पॅथोलॉजी सॅम्‍पल कलेक्‍शन सेंटर

प्रभात पर्व न्यूज - Published: 09-Jan-2024 06:30 pm

पनवेल : ईशान्‍य फाऊंडेशन या दीपक फर्टिलायजर्स अँड पेट्रोकेमिकल्‍स कॉर्पोरेशन लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने आज पनवेल तालुक्यातील तळोजा येथे मोबाइल क्लिनिक लाँच केले. स्‍थानिक समुदायांना घरपोच किफायतशीर व दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा उपलब्‍ध करून देण्‍याचा यामागील मुख्य हेतू आहे. प्रमाणित व पूर्णपणे सुसज्‍ज वैद्यकीय टीम असलेले मोबाइल क्लिनिक तळोजाच्‍या आसपास असलेल्‍या ४१ गावांमध्‍ये प्रवास करणार असून त्या अनुषंगाने हजारो लाभार्थींपर्यंत पोहोचत त्‍यांना प्रतिबंधात्मक व उपचारात्‍मक आरोग्‍यसेवा मिळणार आहे. 

         तसेच फाऊंडेशनने देवीचापाडा येथे एनडीसी पॅथोलॉजी डायग्‍नोस्टिक प्रायव्‍हेट लिमिटेडसोबत सहयोगाने 'ईशान्‍य पॅथोलॉजी सॅम्‍पल कलेक्‍शन सेंटर' देखील लाँच केले आहे. ते स्‍थानिक समुदायाला किफायतशीर पॅथोलॉजी सेवा देणार आहेत. या उपक्रमामुळे चाचण्‍यांचा खर्च ८० ते ९० टक्‍क्‍यांनी कमी होण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे आर्थिकदृष्‍ट्या वंचित रूग्‍णांना मोठा दिलासा मिळेल. विविध मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत ईशान्‍य फाऊंडेशनच्‍या संस्‍थापक विश्‍वस्‍त श्रीमती पारूल मेहता यांच्‍या हस्‍ते मोबाइल क्लिनिक आणि सॅम्‍पल कलेक्‍शन सेंटरचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी एमआयडीसीचे पनवेल विभागीय कार्यालयाचे संतोष थिटे, उपजिल्हाधिकारी डॉ. विक्रांत भालेराव, तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश काळदाते आदी मान्यवर उपस्थित होते.

       उद्घाटनाप्रसंगी मत व्‍यक्‍त करताना ईशान्‍य फाऊंडेशनच्‍या संस्‍थापक विश्‍वस्‍त श्रीमती पारूल मेहता म्‍हणाल्‍या कि, ''मोबाईल क्लिनिक व ईशान्‍य पॅथोलॉजी सॅम्‍पल कलेक्‍शन सेंटरच्‍या उद्घाटनामधून सर्वांसाठी किफायतशीर व दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा, तसेच उच्‍च दर्जाच्‍या डायग्‍नोस्टिक सेवा उपलब्‍ध होण्‍याची खात्री घेत समाजावर सकारात्‍मक परिणाम निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. हे उपक्रम उत्तम आरोग्‍यसेवा उपलब्‍ध होणे हा फायदा नसून अधिकार आहे याची खात्री घेण्‍याप्रती आमच्‍या प्रयत्‍नांमधील आणखी एक पाऊल आहेत. सामुदायिक आरोग्‍याप्रती आमची कटिबद्धता या उद्घाटनापलीकडे आहे. आम्‍ही आरोग्‍याप्रती विषमतेचे निर्मूलन करत आणि सर्वांचे आरोग्‍य उत्तम असण्‍याची खात्री घेत समुदायांना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. हे लाँचेस् ईशान्‍स फाऊंडेशनच्‍या आरोग्‍यम उपक्रमाचे भाग आहेत, ज्‍यांचा दर्जेदार आरोग्‍यसेवा उपलब्‍ध करून देण्‍यावर आणि शाश्‍वत आरोग्‍यसेवा सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित करत स्‍थानिक समुदायांमधील आरोग्‍यसेवेप्रती सर्वांगीण दृष्टिकोन आहे. विद्यमान आर्थिक वर्षामध्‍ये १२,३५२ रूग्‍णांना यशस्‍वीरित्‍या मोफत आरोग्‍य तपासणी व औषधे प्रदान केली आहे. लक्ष्‍मी चॅरिटेबल ट्रस्‍ट पनवेलसोबत सहयोगाने ईशान्‍य फाऊंडेशनने नुकतेच पाले खुर्द आणि आसपासच्‍या गावांमध्‍ये पाच डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन केले. तपासणी करण्‍यात आलेल्‍या ९८८ व्‍यक्‍तींपैकी ३०४ व्‍यक्‍तींना मोतीबिंदू असल्‍याचे निदान झाले आणि १९८ व्‍यक्‍तींवर यशस्‍वीरित्‍या मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या आहेत.तसेच तळोजा परिसरातील २० अंगणवाड्यांना प्रत्येकी एक कपाट आणि वजनाचे काटे दिले. याशिवाय, वावंजे, कळंबोली आणि खारघर भागातील २०० क्षयरूग्णांना सहा महिन्यांसाठी पोषण सहाय्य देण्यात आले आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement