माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सोनवणे यांच्यावर अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला

प्रभात पर्व न्यूज - Published: 11-Nov-2023 12:09 pm

तळोजा : माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सोनवणे यांच्यावर अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी (दि.८ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास नावडे फ्लायओव्हर ब्रिजवर अज्ञात व्यक्तींनी अडवून डोळ्यात रासायनिक द्रव्य फेकून त्यांना मारहाण करण्यात आली. सुदैवाने हल्लेखोरांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाल्याने सोनावणे आपला जीव वाचवू शकले. तळोजे मजकूर येथील रहिवासी असलेले संजय सोनावणे हे माहिती अधिकार कायद्याचा वापर करून गैरप्रकार उघडकीस आणत असतात‌. याचाच राग मनात धरून सूड भावनेने सदर हल्ला झाल्याची माहिती झाल्याची शक्यता आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भीम अनुयायांनी संजय सोनवणे यांना सहकार्य करावे असे, आवाहन भीमशक्ती संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी केली आहे.

        संजय सोनवणे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. शासन व प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक चालावे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते काम असतात. सदर हल्ल्याची घटना ही हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी असून सखोल चौकशी करून गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, संजय सोनवणे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघांने केली आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement