प्रकल्पग्रस्तांसह पनवेलकरांना प्रॉपर्टी कार्ड द्या- जगदीश गायकवाड यांची आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे मागणी

प्रभात पर्व न्यूज - Published: 05-Mar-2024 08:02 pm

पनवेल: स्थानिक प्रकल्पग्रस्तांसह पनवेलकरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, अशी मागणी पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांची आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन आठ वर्षे होऊन सुद्धा प्रकल्पग्रस्तांना तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ ग्रामपंचायतींमधील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाहीत. एकीकडे सिडको आणि दुसरीकडे महानगरपालिका या दोन्ही प्रशासकीय विभागांमुळे पनवेलकरांचे हाल होत असून याचा गांभीर्याने विचार करून प्रकल्पग्रस्तांना तसेच महापालिका हद्दीतील नवीन वसाहतींमधील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, अशी मागणी जगदीश गायकवाड यांनी केली आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना यासंदर्भात पत्र देऊन गायकवाड यांनी ही मागणी केली आहे.

      या पत्राद्वारे जगदीश गायकवाड यांनी पनवेलचे महापालिकेच्या रसते विकासाचे तसेच स्वच्छता, आरोग्य या विभागातील कामाचे कौतुक करत महापालिकेचे नाव देशाच्या पटलावर आणल्याबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांचे कौतुक केले आहे. आपल्या माध्यमातून होणाऱ्या या कामामुळे आपण 'प्रॉपर्टी कार्ड'चा प्रश्न लवकरात लवकर सोडवाल, असा आशावाद जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement