ग्रामपंचायत निवडणूक; पनवेलमध्ये मनसेच्या प्रचारफेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभात पर्व न्यूज - Published: 31-Oct-2023 09:00 am

पनवेल : पनवेलमधील १७ ग्रामपंचायतींमध्ये ५ नोव्हेंबरला मतदान होणार असून पनवेलमधील प्रमुख पक्षांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. विविध ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार उभे राहिले. त्यांच्या प्रचारासाठी पहिल्या टप्प्यात रविवारी पनवेलमधील रिटघर, विचुंबे, भिंगारी, ओवळे, वावेघर, न्हावे, आजीवली, कोन यासारख्या ग्रामपंचायतीमध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वास, रामदास पाटील यांनी व्यक्त केला आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement