एका छोट्या साप्ताहिकाच्या रूपात सुरू झालेले प्रभात पर्व हे आज पनवेल परिसरातील अग्रेसर ऑनलाईन न्यूज चॅनेल म्हणून नावा रुपाला आले आहे. संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या इहलोक सोडल्यावर सुमारे पन्नास वर्षांनंतर, प्रभात पर्वच्या माध्यमातून बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून, त्यांच्या कार्याची माहिती संशोधीत व संकलित करून, ज्यामध्ये त्यांची दुर्मिळ छायाचित्र आणि त्यांच्या शिष्यांची माहिती, अगदी सुरेख पध्दतीने मांडून ओघवत्या भाषा शैलीत आत्मचरित्र रुपाने “साधू बोध” हे चरित्र पुस्तक प्रकाशित करण्यात आले. बाबांच्या या चरित्र पुस्तकाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे एका दिवसातच छापलेल्या सर्व हजार प्रती संपल्या गेल्या . त्या विक्रीतून जमा झालेले सर्व पैसे प्रभात पर्वच्या वतीने बाबांच्या मठाच्या हाती स्वाधीन करण्यात आले. या चरित्र पुस्तकाची सर्वांनी भरभरून स्तुती केली आणि यानंतरच खऱ्या अर्थाने लोकांकडून प्रभात पर्वला प्रसिध्दी आणि प्रेम मिळण्यास सुरूवात झाली. त्यानंतर प्रभात पर्व या वृत्तपत्राच्या माध्यमातून या भागातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक आणि खेळ जगताच्या घडामोडी प्रभावीपणे लोकांसमोर मांडण्यात आल्या.
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान आणि मोबाईलचे म्हणुन ओळखले जाते. त्यामुळे माहिती पुरवण्याची साधणे देखील बदलली असून छापील वृत्तपत्रे, टिव्ही, रेडियो आदींची जागा आता मोबाईलने घेतली असून आपण जेथे असाल तेथे आपल्या हातात सर्व माहिती, घडामोडी मिळत आहेत. बदललेल्या काळाचा स्विकार करीत जानेवारी २०१६ मधे प्रभात पर्वने ऑनलाईन न्यूज चॅनेल सुरू केले. युट्यूब, फेसबुक, व्हाट्सॲप इ. सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या न्यूज चॅनेलसाठीचे वृत्तसंकलन, व्हिडिओ एडिटींग, सादरीकरण आणि प्रसारण हे अत्यंत दर्जेदार ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहे. प्रभात पर्व न्यूज हे पनवेल परिसरातील स्थानिक चॅनेल असून देखील पनवेल आणि नवी मुंबईतील जवळपास सर्वच न्यूज चॅनेल पेक्षाही उत्तम असून चॅनेलचे सादरीकरण आणि व्हिडिओ एडिटींग, व्हिडिओ क्वालिटी तर राज्य स्तरीय प्रादेशिक न्यूज चॅनेलच्या तोडीचे असल्याची सर्वांनीच उघडपणे कबुली दिली आहे. यामध्येच चॅनेलचे खरे यश आहे.
चॅनेल सुरू झाल्यानंतर लगेचच पनवेल महानगरपालिका निर्मितीला चालना मिळण्यास सुरूवात झाली होती. त्यावेळी यासंबंधी सर्व घडामोडी सर्वात आधी प्रभात पर्व न्यूजने लोकांपर्यंत पोहचवल्या. पनवेल महानगरपालिकेत अनेक गावांचा व औद्योगिक परिसराचा देखील समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे पनवेल मधील आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, तत्कालीन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, अरुणशेठ भगत, जी. आर. पाटील, बबनदादा पाटील, एकनाथ देशेकर, हरेश केणी, दिपक निकम इत्यादी महत्वाचे राजकीय पुढारी याशिवाय परेश ठाकूर, पी. डी. देशमुख, सौरभ जोशी, विनोद पाटील, संदीप डोंगरे,जयश्री काटकर यांसारखे अनेक उद्योजक, व्यावसायिक आदी मान्यवरांची, पनवेल महानगरपालिका होणे हे आवश्यक आहे की नाही, वा ती फायदेशीर का तोट्याची या संदर्भात प्रतिक्रिया जाणून लोकांमध्ये याविषयी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला देखील सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्याची प्रशंसा देखिल केली आहे.
प्रभात पर्व न्यूजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील घडामोडींवर प्राधान्याने प्रकाश टाकला गेला आहे. ग्रामीण भागातील समस्या, सांस्कृतिक कार्यक्रम, अखंड हरीनाम सप्ताह, ग्रामीण भागातील खेळाडू, कलाकार, सामाजिक, राजकीय कार्यक्रम याविषयी इतर चॅनेल पेक्षा अधिक प्रमाणात कवरेज देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महानगरपालिका स्थापन झाली परंतु गावच्या समस्या मात्र जशा होत्या तशाच आहेत, त्यामुळे या भागात काय समस्या आहेत आणि त्या सोडविण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत, या संदर्भात थेट त्या-त्या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रीया प्रभात पर्व न्यूजच्या माध्यमातून घेण्यात आल्या. आणि त्याबाबत सर्व स्तरातून कौतुक देखिल करण्यात आले आहे.
प्रभात पर्व न्यूजच्या वर्षपूर्ती निमित्ताने अनेक मान्यवरांनी, चॅनेलच्या वर्षभरात केलेल्या कामाचे कौतुक करून चॅनेलवर प्रसारित करण्यात येणाऱ्या बातम्या, सादरीकरण व उच्चतम दर्जा व ग्रामीण भागातील घडामोडींनी देण्यात येणारे प्राधान्य याविषयी विशेष उल्लेख करीत भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
आता www.prabhatparvnews.in या चॅनेलच्या वेबसाईटमुळे सर्व घडामोडींचा आढावा जलद गतीने घेऊन त्याविषयीची माहिती आपल्याला लवकरात लवकर देता येणार आहे. शिवाय महत्वाच्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण सुद्धा करण्यात येणार आहे. आपल्याला आमच्या उपक्रमा विषयी काय वाटते, शिवाय आपल्या त्या संदर्भात काही सुचना असतील तर नक्कीच आम्हाला त्या कळवाव्या. त्या सूचनांची तत्काळ दखल घेऊन ताबडतोब योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.