पत्रकार सागर राजे यांच्या प्रयत्नामुळे, TIA चे अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्या मध्यस्थीने कामगारांना मिळाली कायदेशीर देणी
प्रभात पर्व न्यूज - Published: 12-Sep-2023 08:24 amतळोजा : तळोजा एमआयडीसीतील जे. के. स्टिल स्ट्रिप्स या कंपनीतील दोन कामगारांना कायदेशीर देणी दिली नव्हती. सुभाषचंद हरिशंकर पांडे यांनी कामावरून राजीनामा दिला होता, तर दिनेश कुमार यादव या कामगाराला कमावरुन कमी करण्यात आले होते. सहसा उत्तर भारतीय कामगार वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे काम सुटल्यानंतर त्यांना कायदेशीर देणी न देण्याची अघोषित प्रथा पडली आहे. परंतु कामगारांनी महाराष्ट्र कामगार संघटनेचे सरचिटणीस आणि प्रभात पर्व न्यूजचे कार्यकारी संपादक असलेले सागर राजे आणि दिपक गायकवाड यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचा वाद कामगार उपायुक्त कार्यालयात उपस्थित करण्यात आला होता.
शेवटी याबाबत तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे (TIA) अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी पुढाकार घेतला. सागर राजे यांनी कामगारांची मांडलेली न्यायाची भूमिका सतीश शेट्टी यांनी योग्यरीतीने कंपनी व्यवस्थापनाकडे मांडली. त्याबाबत कामगार अधिकारी सचिन कोल्हाल यांनी व्यवस्थापनाकडे आग्रह धरून, कामगारांची कायदेशीर देणी देऊन प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना केल्या. सचिन कोल्हाल यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर कंपनीचे मालक धनेश दोशी यांच्या उपस्थितीत कामगार उपायुक्त कार्यालयात सुभाषचंद पांडे आणि दिनेश कुमार यादव या दोन्ही कामगारांना धनादेश देण्यात आले. कामगारांनी याबाबत सागर राजे, दिपक गायकवाड, सतीश शेट्टीअ, कंपनीचे मालक धनेश दोशी आणि कामगार अधिकारी यांचे याबाबत आभार मानले आहेत.