उच्च न्यायालयाकडून पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराला स्थगिती नाही; २६ मार्चला पुढील सुनावणी

प्रभात पर्व न्यूज - Published: 06-Mar-2024 06:14 pm

पनवेल : उच्च न्यायालयात खारघर फोरमच्या वतीने महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरती आज (बुधवार दि. ६ मार्च ) उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्यापुढे सुनावणी घेण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीसाठी पालिकेला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. महापालिकेच्यावतीने जेष्ठ विधीज्ञ ॲड. आशुतोष कुंभकोणी यांच्या समवेत ॲड. केदार दिघे यांनी या याचिकेमध्ये विधीज्ञ म्हणून काम पाहिले. आज याबाबतीत उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर अंतिम निकाल २६ मार्च रोजी देणार आल्याचे सांगितले आहे.

        दरम्यान, मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ताकरामध्ये प्रतिमहा २ टक्के शास्तीमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. मागील ०१ एप्रिल २०२३ पासून ते आज दिनांक ६ मार्च पर्यंत सुमारे २७० कोटी इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. महापालिकेचा मालमत्ता कर हा शहराच्या विकास कामासाठी असल्याने मालमत्ता कर भरणे अनिवार्य आहे; महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरून शहराच्या विकासास हातभार लावावा असे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी केले आहे.

          आज झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महापालिकेने थकबाकीदारांकडून वसुली करण्यावरती भर दिला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात ३ लाख ५० हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदी नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे विविध झोन तयार केले आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने 'सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड' तयार केले आहे. 

       महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच http://www.panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement