के. डी. पाटील ॲन्ड कन्स्ट्रक्शनचे विनोदशेठ पाटील यांनी उचलला दहा गरजू विद्यार्थ्यांच्या वर्षभराचा शैक्षणिक खर्चाचा भार

प्रभात पर्व न्यूज - Published: 04-Jul-2023 04:00 pm

तळोजा : के. डी. पाटील ॲन्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे डायरेक्टर विनोदशेठ पाटील यांनी आपल्या घोट गावातील सद्गुरू वामनबाबा महाराज माध्यमिक विद्यालयातील दहा गरजू विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षभराचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलला आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी (सोमवार, ३ जुलै)शाळेत भेट दिल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हातात पन्नास हजार रुपयांचा चेक देऊन ही मदत करतात आली आहे, अनोख्या पद्धतीने गुरूपौर्णिमा साजरी केली आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी शाळेतील दहा गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

              याबाबत विनोदशेठ पाटील यांनी सांगितले की, 'गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मी शाळेला भेट दिली आणि मुख्याध्यांकांना शाळेतील आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गातील दहा गरजू विद्यार्थ्यांची माहिती मागविली. संबंधित गरजू मुलांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन, त्या मुलांचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे त्यांना सांगितले. ताबडतोब दहा विद्यार्थ्यांची शालेय फी म्हणून असलेली पन्नास हजार रुपयांचा रकमेचा चेक मुख्याध्यापकांच्या हातात दिला.‌ शिवाय दरवर्षी शाळेतील दहा गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणार असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले. 

         दरम्यान, विनोदशेठ पाटील यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानले असून घोट ग्रामस्थांकडून देखील त्यांचे कौतुक केले जात आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement