बेवारस इसमाच्या मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे तळोजा पोलिसांचे आवाहन

प्रभात पर्व न्यूज - Published: 01-Jul-2023 10:43 am

तळोजा : तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ३५ ते ४० वयाचा इसम गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता. तळोजा फेज-२ येथे, सेक्टर-२६ मधील शिर्के साइटच्या बाजुला गोणपाटाच्या सहाय्याने सदर अनोळखी इसम गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर सकाळी नऊ वाजता डॉक्टरांकडून सदर व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले.

         अंगाने मध्यम, केस काळे, दाढी मिशी, अंगात हिरव्या रंगाचा टीशर्ट, काळी पँट अशा वर्णनाच्या या इसमाचा नाव, पत्ता याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध झाली नसून तळोजा पोलीसांकडून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. याविषयी काही माहिती मिळाल्यास ०२२-२७४१२३३३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन तळोजा पोलीसांनी केले आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement