ज्येष्ठ धवलारीन मंजुबाई धर्मा ठाकूर यांचे निधन
प्रभात पर्व न्यूज - Published: 26-Aug-2023 01:47 pm
खारघर : खारघर पंचक्रोशीतील नामवंत धवलारीन मंजुबाई ठाकूर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. गुरूवारी (दि.२४ ऑगस्ट ) त्यांनी मुर्बी येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, एकूण २० नातं व नातू तसेच २९ पणती व पणतू असा भला मोठा परिवार आहे. मंजुबाई ठाकूर यांनी त्यांच्या आयुष्यात दोन पिढ्यांना धवला गायन केले आहे. त्यांचा आवाज अतिशय सुमधुर होता. त्या काळात अनेक गृहिणी त्यांचा आवाज ऐकण्याकरीत लग्न मंडपात येत असत. त्यावेळी लग्न म्हटलं की, 'मंजुबाई याचं धवला गायन' हे जणू समीकरण ठरलेलंच असायचं.