लोकसभा निवडणूक; महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, रायगडमध्ये ७ मे, मावळमध्ये १३ मे तर मुंबई ठाण्यात २० मे रोजी मतदान

प्रभात पर्व न्यूज - Published: 16-Mar-2024 04:44 pm

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करत आहेत आहे. एप्रिल, मे, जून अशा तीन महिन्यात देशभरात सात टप्प्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे, १ जून रोजी लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे या पाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल मंगळवार ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. यासोबतच देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे. २०२४ हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केलं.

 

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?????◾️

 

◾️पहिला टप्पा - १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

 

◾️दुसरा टप्पा २६ एप्रिल- बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

 

◾️तिसरा टप्पा ७ मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

 

◾️चौथा टप्पा १३ मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

 

◾️पाचवा टप्पा २० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement