रायगडाच्या कामगार उपायुक्त पदी बाळासाहेब वाघ यांची नियुक्ती
प्रभात पर्व न्यूज - Published: 03-Jul-2023 09:15 pm
पनवेल : प्रदीप पवार यांच्या बदली नंतर रायगडच्या कामगार उपायुक्त पदी बाळासाहेब वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी किराणा बाजार मंडळ, मुंबई याठिकाणी ते मंडळाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. दरम्यान, प्रदीप पवार यांची ठाणा जिल्हा कामगार उपायुक्त पदी बदली झाली आहे .
रायगड जिल्ह्यातील कामगार चळवळीला मोठा इतिहास असून तसेच येथील कामगार आपल्या हक्कांविषयी अधिक जागरूक आहेत. कामगारांचे प्रश्न सोडविताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे, अशी खबरदारी कामगार अधिकारी म्हणून काम करताना सर्वांनी घेणे आवश्यक आहे. त्याबरोबरच कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये सलोखा कसा राहील व त्यांचे प्रश्न न्यायालयात न नेता याच कार्यालयात कसे सोडवता येतील आणि औद्योगिक शांतता आणि सलोखा कसा कायम राहील, याकडे रायगड जिल्हा कामगार उपायुक्त म्हणून निश्चितच काम करत असताना विशेष लक्ष दिले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.