'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियान; रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल प्रथम क्रमांकाने सन्मानित

प्रभात पर्व न्यूज - Published: 05-Mar-2024 07:04 pm

पनवेल : महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानात मुंबई विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविणाऱ्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवार दि. ०५ मार्च) मुंबईत झालेल्या सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते समारंभपुर्वक सन्मानित करण्यात आले. रक्कम २१ लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. हा सन्मान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक परेश ठाकूर, मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी स्वीकारला. 

           नरिमन पॉईंट मधील एनसीपीए हॉल येथे झालेल्या या सोहळ्यास शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, विधान परिषद सदस्य कपिल पाटील, शिक्षण विभाग आयुक्त सूरज मांढरे, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, आमदार राजेश पाटील, विक्रम काळे, गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रवीण पटेल यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

     प्रथमच राज्यात आयोजित करण्यात आलेल्या "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले राज्यातील ०१ लाख ३ हजार ३१२ शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हे अभियान उदंड केले. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे पार पाडले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले होते. या अभियानात सतत उज्वल यशाची परंपरा असलेल्या आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या नवी मुंबईतील प्रतिष्ठित अशा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" सहभाग घेतला होता. सर्वांगीण शिक्षण विकास, शिस्तबद्ध, अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असलेल्या या विद्यालयाने या अभियानाच्या सर्व निकषानुसार जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्यानुसार या विद्यालयाने मुंबई विभागात अव्वल स्थान पटकावत रायगड नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला होता. आता "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानात प्रथम क्रमांक पटकावत पुन्हा एकदा रायगड व नवी मुंबईला शिक्षण क्षेत्रात उच्चस्थानी नेण्यासाठी दैदिप्यमान कामगिरी केली आहे. 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement