तळोजा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी अविनाश काळदाते
प्रभात पर्व न्यूज - Published: 28-Jun-2023 03:20 pm
तळोजा : जितेंद्र सोनावणे यांच्या बदली नंतर तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून अविनाश काळदाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीस वर्षांपासून पोलिस सेवेत असणारे अविनाश काळदाते हे या अगोदर नवी मुंबई पोलीस आयुक्त लयात नियंत्रण कक्षात कार्यरत होते. नुकताच अविनाश काळदाते यांनी तळोजा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, जितेंद्र सोनावणे यांची नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये २८ लहान-मोठी गावे, ९०० पेक्षा अधिक कारखाने, तसेच सिडकोच्या तळोजा व नावडे येथील वसाहती असा फार मोठा परीसर येत असल्याने येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद महत्वाचे समजले जाते.
