शेकाप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अर्बन बँक आणि बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
प्रभात पर्व न्यूज - Published: 19-Jun-2023 08:21 pmपनवेल : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी ( दि.१८ जून ) रोजी पनवेल को-ऑप अर्बन बँक व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती मधील नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार समारंभ व पदाधिकारी मेळावा व्हि.के. हायस्कूल पनवेल येथे संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध पुरोगामी विचारवंत तथा परखड वक्ते कॉम्रेड दत्ता देसाई यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस प्राध्यापक एस. व्ही. जाधव यांनी देखील कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी विराजमान झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये चेअरमन बाबुराव पालकर, डॉ. हितेन शहा,अनिल केणी, राजेश खानावकर, दिलीप कदम, पांडुरंग भागीवंत, बी. पी. म्हात्रे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले शेतकरी कामगार पक्षाच्या पॅनलचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये सभापती नारायण घरत, देवेंद्र मढवी, अशोक गायकर, मच्छिंद्रनाथ पाटील, बाळकृष्ण पाटील,महादू पाटील, अर्जुन गायकर, सुभाष हरिभाऊ पाटील, सखाराम गंगाराम पाटील, सुनील सोनावळे, देवेंद्र अनंत पाटील, दिनेश ज्ञानेश्वर महाडिक, ललिता फडके सोमनाथ म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथ पाटील, बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेकापचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवनिर्वाचित संचालक, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.