ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांना 'राज्यस्तरीय भजन सम्राट पुरस्कार'

प्रभात पर्व न्यूज - Published: 12-Jun-2023 06:03 pm

पनवेल : अध्यात्मिक व संगीत श्रद्धेचा वारसा अखंडपणे चालविणारे प्रसिद्ध भजन सम्राट ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांना पत्रकार उत्कर्ष समितीच्यावतीने 'राज्यस्तरीय भजन सम्राट पुरस्काराने' समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. निवृत्तीबुवा चौधरी यांनी वयाच्या १० व्या वर्षी त्यांच्या वडिलांकडून गायनाचे धडे गिरवले. पुढे पंडित राम मराठे यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून धडे घेतले. आज ते भजन क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व असून 'भजनसम्राट' म्हणून प्रसिद्ध आहेत.

        देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पखवाज (मृदुंग), टाळ आणि पेटीच्या (हार्मोनियम) साथीने सादर होणारी भजनं, अभंग ही महाराष्ट्राची ओळख आहे. पारंपरिक लोकगीतं, भजनं आणि अभंग आजवर केवळ मौखिक स्वरुपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत आले आहेत. सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. या ठेव्याची पुढील पिढीला ओळख व्हावी, हा वारसा जतन व्हावा यासाठी, नादब्रह्म साधना मंडळ परिवाराचे प्रमुख भजन सम्राट निवृत्तीबुवा चौधरी आणि त्यांची पिढी तसेच शिष्यगण सतत कार्यरत आहेत. ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांनी भजन संस्कृती टिकविण्याबरोबरच शेकडो शिष्याच्या माध्यमातून आदर्शवत वसा पुढे सुरु ठेवला. त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान अत्यंत कौतुकास्पद असल्याने त्यांचा पत्रकार उत्कर्ष समितीच्यावतीने पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या समारंभात २०२३ सालाचा राज्यस्तरीय भजन सम्राट पुरस्काराने गौरव करण्यात आला.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement