दीपक फर्टीलाझर्स व ईशान्य फाऊंडेशन मार्फत शेतकरी प्रशिक्षण

प्रभात पर्व न्यूज - Published: 09-Jun-2023 05:57 pm

तळोजा : दिपक फर्टिलायझर्स ऍण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन व ईशान्य फाऊंडेशनमार्फत नुकतेच पालेखुर्द येथे दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण कार्क्रमाचे उदघाटन दिनेशप्रताप सिंग (ईव्हीपी ऑपरेशन्स DFPCL) व सुनील काटकडे (LDO पंचायत समिती पनवेल) यांच्या उपस्थित झाले. या प्रसंगी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना डॉ. शौकत शिकलगर (LSS पंचायत समिती पनवेल), श्रीहरी खाटावकर (एरिया मॅनेजर इंटास कंपनी), व प्रितेश सरोदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी १०० कालवडीसाठी खाद्य व उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ६ महिलांना ब्युटी पार्लर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

             दीपक फर्टिलायझर्स यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशन मार्फत जवळपास ५५ गावामध्ये "पशुधन विकास कार्यक्रम" राबवला जात असून यामध्ये प्रामुख्याने कृत्रिम रेतन सुविधा, चारा पीक विकास, गाई खरेदीसाठी मदत, लसीकरण, पशुधन आरोग्य सुविधा व शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणी इत्यादी घटकांवर काम केले जात आहे. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रमोद जगताप- असोसिएट डायरेक्टर ईशान्य फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप आर. काकडे (AGM-CSR DFPCL), नंदलाल पवार (प्रकल्प समन्वयक - ईशान्य फाउंडेशन) व टीम यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आवश्यक व्यवस्था केली.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement