ऐतिहासिक वडाळे तलावाला लवकरच मिळणार जलपर्णीच्या विळख्यातून मुक्ती

🕒 08-05-2026 03:14 PM | Prabhat Parv News

पनवेल : शहराचे भूषण आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या वडाळे तलावाच्या संवर्धनासाठी पनवेल महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या ‘जैविक नियंत्रण’ मोहिमेंतर्गत अत्यंत कमी खर्चात ‘साल्व्हिनिया विविल’ हे भुंग्याच्या प्रजातीतील किडे वडाळे तलावातील जलपर्णी नष्ट करतील व वडाळा तलाव पुर्ववत सुंदर होणार असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी सांगितले. वडाळे तलावात वाढलेल्या ‘साल्व्हिनिया मोलेस्टा’ (Salvinia molesta) या आक्रमक जलपर्णीच्या निर्मूलनासाठी ‘जैविक नियंत्रण’ मोहिमेचा शुभारंभ दिनांक बुधवारी ७ मे रोजी महापौर यांच्या हस्ते तलावात ‘साल्व्हिनिया विविल’ (Cyrtobagous salviniae) या जैविक कीटकांचे विसर्जन करून करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

     या कार्यक्रमास सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे, महिला बालकल्याण सभापती ममता म्हात्रे,महापालिका सदस्य, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, समाजसेविका ज्योती नाडकर्णी, रंजना सडोलीकर, आसीएआर संस्थेच्या संशोधिका डॉ. अर्चना अनोखे, दिक्षा एजी महापालका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक भाषेत ‘चायनीज झालर’ म्हणून ओळखली जाणारी ही जलपर्णी अत्यंत वेगाने वाढणारी असून ती तलावातील पाण्यावर दाट थर निर्माण करते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासेमारी, जलचर जीवसृष्टी व जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच तलावात डासांची पैदास वाढून आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

या समस्येवर उपाय म्हणून पनवेल महानगरपालिकेने पर्यावरणपूरक व शाश्वत अशी जैविक नियंत्रण पद्धत स्वीकारली आहे. ‘साल्व्हिनिया विविल’ हे विशिष्ट भुंगे केवळ जलपर्णीच्या पानांवर व फांद्यांवर उपजीविका करतात. त्यामुळे जलपर्णीची वाढ नैसर्गिकरित्या खुंटते व कालांतराने ती नष्ट होऊन तलावाच्या तळाशी बुडते. या प्रक्रियेमुळे पाणी, मासे किंवा इतर जलचर प्राण्यांना कोणतीही हानी पोहोचत नाही. या तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वी मध्य प्रदेशातील सारणी येथे सुमारे ४,००० हेक्टर क्षेत्रावरील जलपर्णी निर्मूलनासाठी यशस्वीरीत्या करण्यात आला आहे. तसेच जबलपूर येथील गिदुराहा व मुरवारी तलावही या पद्धतीमुळे जलपर्णीमुक्त करण्यात यश आले आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीएआरआय या कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने जलपर्णी नष्ट करण्यावरच्या शाश्वत उपाययोजना अवलंब पालिकेने केल्याने वडाळा तलाव पुन्हा एकदा जलपर्णी मुक्त होणार आहे. या मोहिमेचे प्राथमिक परिणाम पुढील ६ ते ८ महिन्यांत दिसण्यास सुरुवात होईल, तर सुमारे १५ ते १८ महिन्यांत वडाळे तलाव पूर्णपणे जलपर्णीमुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Comment

Comments

प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026