बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन

🕒 13-07-2026 11:45 AM | Prabhat Parv News

कळंबोली : कळंबोली येथील सेक्टर-१५ मधील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याची माहिती मिळाल्यास कळंबोली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून २०२६ रोजी संबंधित इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दुपारी १२.१० वाजता उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

            मृत इसमाचे वय अंदाजे ४० ते ४२ वर्षे असून तो अंगाने सडपातळ आहे. त्याचा रंग काळा, चेहरा उभट, केस काळे-पांढरे आणि नाक बसके आहे. त्याच्या अंगावर काळ्या-खाकी रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट होती. या इसमाची ओळख अथवा त्याच्या नातेवाईकांबाबत माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनिल होलार (मो. ८१०८१६१७०९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Comments

तळोजे मजकूर येथील ह.भ.प. जयश्री ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
28 Aug 2026
प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026