मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

🕒 09-07-2026 06:02 AM | Prabhat Parv News

ठाणे : समुद्री वाहतूक व कामगार क्षेत्रातील संघटनात्मक कार्याची दखल घेत मनीष चंद्रकांत वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना' या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राजेश चंद्रसेन घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्ती करण्यात आल्याची त्यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीबद्दल शिवसैनिकांसह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून राज्यातील कामगार व नाविकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

              या नियुक्तीप्रसंगी ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे संस्थापक तथा अध्यक्ष संजय वासुदेव पवार, महाराष्ट्र राज्य चिटणीस तथा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख भुषण चंदगांवकर यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मनीष वैती यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Comments

Manish vaity
2026-07-09 01:08:26

मनपूर्वक आभार

प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026