जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक

🕒 24-07-2026 04:24 PM | Prabhat Parv News

तळोजा : नितळस गावातील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वर्कशॉपमध्ये जुन्या वादातून एका चालकाची हत्या केल्याची घटना घडली. १३ जुलै रोजी रात्री चंदन कपीलमुणी पांडे आणि रमेशकुमार स्वामीनाथ यादव यांच्यात गावाकडील जुन्या वादाच्या कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर १४ जुलै रोजी पहाटे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी रमेशकुमार यादव याने चंदन पांडे यांच्या डोक्यात अवजड वस्तूने प्रहार करून गंभीर दुखापत केली आणि घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी वर्कशॉपचे वॉचमन मोहम्मद आलम हजिफुल खान यांच्या तक्रारीवरून तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

        गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी तळोजा पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या तपासादरम्यान आरोपी रमेशकुमार यादव गुजरातमधील बलसाड रेल्वे स्थानकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले आणि त्यांच्या पथकाने बलसाड रेल्वे स्थानकातून आरोपीला ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या ४४ तासांच्या आत आरोपीला अटक करून पोलिसांनी हत्येचा तपास उघडकीस आणला.

           आरोपी रमेशकुमार यादव याला १६ जुलै रोजी दुपारी १२.३७ वाजता अटक करण्यात आली असून, त्याला पनवेल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी घेण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ पनवेल श्रीमती रश्मी नांदेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त खारघर विभाग विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर निकम यांच्यासह तळोजा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment

Comments

Good work Navi Mum bai police
2026-07-24 10:00:27

Also keep patroling in the night as anti elements are roaming the streets of Taloja and robbing households

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
शिवसेना शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण; आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित
01 Sep 2026
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलचेच नाव‌ का?
31 Aug 2026
तळोजे मजकूर येथील ह.भ.प. जयश्री ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
28 Aug 2026
प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026