तळोजे मजकूर येथील ह.भ.प. जयश्री ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
तळोजे मजकूर गावातील ह.भ.प. जयश्री ज्ञानेश्वर पाटील यांचे सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. वैकुंठवासी श्रीगुरु रामदास पाटील यांच्या त्या सून असून त्यांच्या मागे पती ह.भ. प. ज्ञानेश्वर पाटील, मुलगा ह.भ.प. शुभम पाटील, मुलगी ह.भ.प. वैष्णवी पाटील तसेच दिर, भावजय, नातवंडा असा मोठा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी बुधवार, २ सप्टेंबर रोजी तळोजे मजकूर येथील शिव मंदिरात होणार आहे. यावेळी सकाळी ९ वाजता ह.भ.प. श्री. लालचंद महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
तसेच उत्तरकार्य रविवार, ६ सप्टेंबर रोजी अवरनाथ (पूर्व), शिव मंदिर रोडवरील फ्लावर सोसायटी येथे आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. श्री. दीपक महाराज दुर्गे (रायगड पाषाण) यांचे कीर्तन होणार आहे.