दिलेला शब्द पाळला! सामाजिक बांधिलकी जपत शाळेसाठी आर्थिक योगदान
नावडे : नगरसेवक म्हणून मिळणारे सहा महिन्यांचे मानधन नावडे येथील प्राथमिक शाळेला सुपूर्द करून नगरसेवक राम महादू पाटील यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. वह्या वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करत शाळेला हे मानधन सुपूर्द केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, या उद्देशाने राम पाटील यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. शिक्षण क्षेत्राला सहकार्य करण्याच्या भावनेतून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे विशेष महत्त्व आहे. दिलेला शब्द पाळत शाळेसाठी आर्थिक योगदान देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.या वेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांचे सुपुत्र आदित्य पाटील, रोशन पाटील आणि धनाजी म्हात्रे उपस्थित होते. नगरसेवक राम पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी दिलेले हे योगदान विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Leave a Comment
Comments
Good 👍