कळंबोलीत अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू; वारसांचा शोध सुरू

🕒 04-11-2026 04:17 PM | Prabhat Parv News

कळंबोली : कळंबोली येथील अभ्युदया नाका परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या इसमाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन कळंबोली पोलिसांनी केले आहे.

         सदर इसम अंदाजे ३५ वर्षांचा असून तो फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. २८ सप्टेंबर २०२६ रोजी श्री हनुमान कम्युनिकेशनसमोर, अभ्युदया नाका, कळंबोली येथे तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी त्याला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, २ नोव्हेंबर २०२६ रोजी उपचारादरम्यान शारीरिक आजारामुळे त्याचा मृत्यू झाला.

             मृत इसमाचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी तसेच त्याच्या वारसांचा शोध घेण्यासाठी कळंबोली पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले आहे. या इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस स्टेशनशी अथवा पोलीस उपनिरीक्षक रणजित जाधव यांच्याशी 9193531955 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Comments