पनवेलमध्ये राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

🕒 06-06-2026 02:44 PM | Prabhat Parv News

पनवेल : राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी (दि. ५ जून) व्ही. के. हायस्कूल, पनवेल येथे उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातील शिक्षक, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

            कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास लातूर-उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रविण स्वामी, पुण्याचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रेय सामंत, प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले, ॲड. बी. एल. सगर किल्लारीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

          यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षिकांचा ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार’ आणि ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसीरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. विविध ठिकाणांहून आलेल्या शिक्षक, शिक्षिका व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिवेशनाला विशेष रंगत प्राप्त झाली. विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन आणि सन्मान सोहळ्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Comment

Comments

प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026