पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य अ‍ॅक्वेरियम केंद्रा उभारणीसंदर्भात नितेश राणे यांची विशेष बैठक

🕒 07-05-2026 07:19 AM | Prabhat Parv News

मुंबई : पनवेल सारख्या भौगोलिक महत्त्व असलेल्या व झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात एखादा मोठा पर्यटन दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असणे आवश्यक आहे या दूरदृष्टीने आमदार विक्रांत पाटील यांनी अर्थसंकल्प वास्तववादी अधिवेशन २०२६ मागणी केली होती. याविषयावर मंत्री नितेश राणे यांनी प्रस्तावाचे कौतुक करत याविषयाची तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. 

         याविषयाची महत्त्वपूर्ण बैठक मंत्री मत्स्यव्यवसाय नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्या सोबत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेलचे भौगोलिक महत्त्व व या आंतराष्ट्रीय दर्जाच्या अ‍ॅक्वेरियमची आवश्यकता हे विषय विस्तृतपणे माहिती देऊन पटवून दिले. विशेषतः जवळच साकारलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नव्याने होत असलेली तिसरी मुंबई तसेच नैना प्रकल्प यामुळे यासंपूर्ण भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे असा अ‍ॅक्वेरियमचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाला चालना देणारा ठरेल. तसेच या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचा अभ्यास, शैक्षणिक संशोधन आणि स्थानिक रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल, याचे महत्व आमदार विक्रांत पाटील यांनी पटवून दिले. या प्रकल्पासाठी लागणारी जागा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून पनवेल येथील मत्स्य उपकेंद्राच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार असून हि जागा गोडे पाणी व खारे पाणी याची उपलब्धता असणारी आहे. तसेच प्रकल्पाच्या पुढील विकासासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभाग पुढील आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.  

           या प्रकल्पामध्ये सागरी तसेच गोड्या पाण्यातील विविध जीवसृष्टीचे प्रदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अ‍ॅक्वेरियम, तसेच पर्यटकांना आकर्षित करणारे “सी लायन शो” यांसारख्या उपक्रमांचा समावेश असणार आहे. हा प्रकल्प आंतराष्ट्रीय दर्जाचा असणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे सल्लागार नियुक्त केले जातील असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. या बैठकीस मत्स्य विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, कोंकण कृषी विद्यापीठ दापोलीचे अधिकारी, इतर तज्ज्ञ आणि जिल्हाधिकारी कार्यालय रायगड चे अधिकारी उपस्थित होते. पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचा विश्वास आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Comments

प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026