पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती 'ड' मार्फत अतिक्रमण विरोधी कारवाई

🕒 08-05-2026 02:48 PM | Prabhat Parv News

पनवेल : पनवेल प्रभाग समिती 'ड' मार्फत आज ( गुरूवार ८ मे) मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ड हद्दीतील अंतिम भूखंड क्रमांक २१७ मधील पनवेलमधील ऐतिहासिक ज्यू दफनभूमीशी संबंधित असलेल्या वादग्रस्त जागेवरील अनेक घरे आणि इतर बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात न्यायालयीन आदेशानुसार ही निष्कासन कारवाई करण्यात आली.

      आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी मा.अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे , सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने तसेच प्रभारी प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे व पोलीस दल,अग्निशमन दल, रायगड सुरक्षा रक्षक, एम एफ चे सुरक्षा बल तसेच सर्व प्रभागातील अतिक्रमण कर्मचारी उपस्थित होते. अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या व अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने तोडक कारवाईचा बडगा उचलला असून यापुढेही अतिक्रमणांवर अशाच प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहील, असे महापालिकेतर्फे सूचित करण्यात आले आहे.

Leave a Comment

Comments

प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026