कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनिकेत तटकरे बिनविरोध

🕒 04-06-2026 10:46 AM | Prabhat Parv News

रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, गुरुवारी (दि. ४ जून) त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

         या निवडणुकीसाठी एकूण सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अनिकेत तटकरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने, आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली महेंद्र दळवी, शेतकरी कामगार पक्षाच्या मानसी संतोष म्हात्रे व अरविंद पुंडलिक म्हात्रे तसेच अपक्ष उमेदवार अनिल रमेश चोपडा यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. 

        मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी सर्वच उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या माघारीचा. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांसह इतर अपक्ष उमेदवारांनीदेखील माघार घेतल्याने तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. दरम्यान, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे तथा शेकापचे उमेदवार यांनी सांगितले. 

          एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीसमोर आव्हान उभे केले होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आणि पक्षस्तरावरील चर्चेनंतर त्यांनीही आपला अर्ज मागे घेतला. सर्व विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीची गरजच उरली नाही. परिणामी, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली. महायुतीसाठी हा मोठा राजकीय विजय मानला जात असून कोकणातील राजकीय समीकरणांमध्ये या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Comment

Comments

प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026