आगरी-कोळी समाजासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते गौरव म्हात्रे यांच्यावर हल्ला

🕒 04-06-2026 08:33 AM | Prabhat Parv News

उलवे: उलवे सेक्टर-१७ येथील सरदारजी किचन हॉटेलजवळ बुधवारी मध्यरात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत आगरी-कोळी समाजासाठी विविध सामाजिक उपक्रमांमुळे परिचित असलेले तरुण कार्यकर्ते गौरव म्हात्रे जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार, उलवे येथील विकी गुंजाळकर याच्याशी काही व्यक्तींचा वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अभय म्हात्रे, गौरव म्हात्रे, तुषार घरत आणि इतर मित्र घटनास्थळी पोहोचले. यावेळी चार जणांकडून विकी गुंजाळकर व त्याच्या मित्रांना धक्काबुक्की करण्यात येत होती. संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे.

      वाद मिटविण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी उपस्थितांशी हुज्जत घालत शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू केली. त्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. यावेळी एका आरोपीने कारमधील बिअरची बाटली काढून गौरव म्हात्रे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच तुषार घरत यांनाही बाटलीने मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले.

      घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी भोर येथील शिवम मोहिते, उलवेतील जय पवार आणि बेलापूर येथील संतोष सोसे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले असून दोन संशयिताचा शोध सुरू आहे. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे पाठविण्यात आले.


गौरव म्हात्रे हे आगरी-कोळी समाजातील सामाजिक, सांस्कृतिक आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे तरुण म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Comments

प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026