विचुंबे येथे संयुक्त जयंती महोत्सव; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

🕒 21-05-2026 08:05 AM | Prabhat Parv News

पनवेल : विचुंबे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक २३ मे २०२६ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

       भारतीय जनता पार्टी विचुंबे तसेच विचुंबे देवद उसर्ली वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती महोत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त होणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

          या जयंती महोत्सवाचे आयोजन अविनाश दादा सुभाष गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरावर नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा जाहीर करण्यात आली असून समाजातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, सामाजिक एकात्मता मजबूत करणे आणि समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

        या भव्य जयंती महोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Comments

पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व
26 Sep 2026
शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी पनवेलमध्ये ‘शाळा वाचवा’चा नारा
21 Sep 2026
खारघरकरांसाठी शासकीय वैद्यकीय योजनांबाबत मार्गदर्शन
21 Sep 2026
वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन
16 Sep 2026
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
13 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
शिवसेना शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण; आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित
01 Sep 2026
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलचेच नाव‌ का?
31 Aug 2026