पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्रुती म्हात्रे यांची नियुक्ती

🕒 22-05-2026 09:03 AM | Prabhat Parv News

पनवेल : कामगार नेते दिवंगत शाम म्हात्रे यांच्या कन्या श्रुती शाम म्हात्रे यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी त्या काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून कार्यरत होत्या. पक्ष संघटन आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

           महाराष्ट्रात काँग्रेस पक्षातर्फे सध्या संघटनात्मक नियुक्त्यांना वेग देण्यात आला असून, ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत विविध जिल्हे आणि शहरांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या जागी श्रृती म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे तसेच स्थानिक मार्गदर्शक आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार आभार मानले आहेत. 

           यावेळी बोलताना श्रुती म्हात्रे यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण या पदाचा पूर्ण क्षमतेने उपयोग करू, अशी ग्वाही दिली. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या काकांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे येत्या २८ तारखेला उत्तरकार्य विधी पार पडल्यानंतरच आपण अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे श्रुती म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Comments

पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व
26 Sep 2026
शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी पनवेलमध्ये ‘शाळा वाचवा’चा नारा
21 Sep 2026
खारघरकरांसाठी शासकीय वैद्यकीय योजनांबाबत मार्गदर्शन
21 Sep 2026
वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन
16 Sep 2026
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
13 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
शिवसेना शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण; आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित
01 Sep 2026
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलचेच नाव‌ का?
31 Aug 2026