मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेची पर्स हिसकावणाऱ्या विधी संघर्षित बालकाला तळोजा पोलिसांनी घेतले ताब्यात

🕒 24-05-2026 07:33 AM | Prabhat Parv News

तळोजा : तळोजा परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेची पर्स हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकाला तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कारवाईत पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

      तळोजा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 161/26 नुसार, फिर्यादी सौ. शशिकला सुनीलकंठ मिश्रा (वय 49, रा. तळोजा फेज-2) या 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांची पर्स हिसकावून मोबाईल व इतर मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता.

      या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना पोलिसांनी तळोजा, खारघर, कामोठे, सानपाडा, वाशी, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी आणि टिळक नगर परिसरातील तब्बल 120 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली.

      या कारवाईदरम्यान तळोजा, कामोठे आणि खारघर पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये जबरी चोरी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सदर विधी संघर्षित बालकास 23 मे 2026 रोजी बाल कल्याण समिती, कर्जत यांच्यासमोर हजर करण्यात आले असून समितीच्या आदेशानुसार त्याला कर्जत येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

         ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायट पोलिस निरीक्षक निलेश येवले, पोलीस हवालदार अमर भोईर, विनोद डुंबरे पाटील, हरिदास करडे, संभाजी कोळेकर, सागर पाटील, विकास ठाकूर आणि दिपीका चव्हाण यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Comments

चैताली म्हात्रे
2026-05-28 04:31:04

चांगलाच चोप द्या साहेब.

Sudhir R Sonkamble
2026-05-26 05:57:08

Congratulations 👏🏻👏🏻👍🏻👍🏻

पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व
26 Sep 2026
शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी पनवेलमध्ये ‘शाळा वाचवा’चा नारा
21 Sep 2026
खारघरकरांसाठी शासकीय वैद्यकीय योजनांबाबत मार्गदर्शन
21 Sep 2026
वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन
16 Sep 2026
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
13 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
शिवसेना शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण; आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित
01 Sep 2026
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलचेच नाव‌ का?
31 Aug 2026