तळोजा गुन्हे प्रकटीकरण पथकाची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस

🕒 19-06-2026 04:47 AM | Prabhat Parv News

तळोजा : तळोजा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडी चोरीच्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ९ आरोपींना अटक करून ८ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एकूण ११ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

         पहिल्या प्रकरणात तक्रारदार गणेश संजय घाटे यांनी तळोजा फेज-२ येथील बांधकाम साईटवरील गोडाऊनमधून सुमारे ३ लाख १ हजार रुपयांच्या फिनोलेक्स कंपनीच्या वायरच्या बंडलची चोरी झाल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक २२५/२०२६ दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस उपआयुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम आणि तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एक पुरुष आणि पाच महिला आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. तपासात या आरोपींनी तळोजा परिसरातील आणखी दोन, खारघर परिसरातील दोन आणि पनवेल परिसरातील एका घरफोडीची कबुली दिली. त्यामुळे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींकडून ३ लाख ७४ हजार १५६ रुपयांचा चोरीचा माल हस्तगत केला असून गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपयांची रिक्षाही जप्त केली आहे. या प्रकरणात ताजउद्दीन निजामउद्दीन मन्सुरी याच्यासह मिरा कांबळे, सुनिता उपाध्ये, सुजाता उपाध्ये, कविता कांबळे आणि ज्योती सकट या महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.

       दुसऱ्या प्रकरणात प्रकाश साहेबराव यादव यांनी अडिवली-किरवली येथील त्यांच्या वर्कशॉपमधून चार जेएलजी मशिन्समधील पीसीबी इलेक्ट्रॉनिक ग्राउंड कंट्रोल मॉड्युल युनिट चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२६ दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली तसेच तळोजा परिसरातील आणखी एका घरफोडीची माहितीही दिली. या कारवाईत एकूण दोन गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात साहिल पप्पू अली शहा, साकिब हारून इनामदार आणि मोहम्मद हुसेन अखलाक शेख यांना अटक करण्यात आली आहे.

        दोन्ही प्रकरणांतील तपास आणि कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर निकम, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे, गुरुनाथ मुंडेरे, दीपक सावंत, शंकर शिंदे, अजय मढवी, राजेश उगाडे आणि सचिन माने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तळोजा गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या या कारवाईमुळे घरफोडीच्या एकूण आठ गुन्ह्यांचा छडा लागला असून परिसरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी सांगितले.

Leave a Comment

Comments

Akash Daravkar
2026-06-19 05:21:30

Proud Of Taloja Police Team

Akash Daravkar
2026-06-19 05:21:29

Proud Of Taloja Police Team

जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026
रोडपालीतील रस्ता बंद, डम्पिंग ग्राउंड व नागरी समस्यांविरोधात ३० जूनला पनवेल महापालिकेवर भव्य मोर्चा
21 Jun 2026
तळोजा गुन्हे प्रकटीकरण पथकाची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस
19 Jun 2026