'स्वच्छतेसाठी महापौर आपल्या प्रभागात” मोहिमेंतर्गत प्रभाग १८ मधील संपूर्ण परिसराची स्वच्छता'

🕒 09-05-2026 04:26 PM | Prabhat Parv News

पनवेल : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “स्वच्छतेसाठी महापौर आपल्या प्रभागात” या विशेष मोहिमेंतर्गत आज, (शनिवार दि. ९ मे) प्रभाग क्रमांक १८ मध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता करून महापौर नितीन पाटील यांनी नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविला.

      या व्यापक स्वच्छता मोहिमेत सभागृह नेते प्रकाश बिनेदार, महापालिका सदस्य सुमित झुंजारराव, स्नेहल ढमाले तसेच प्रीती जॉर्ज यांनी उपस्थित राहून स्वच्छता दूतांचा उत्साह वाढविला. तसेच पालिकेचे विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे तसेच संबंधित प्रभागांतील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. मोहिमेदरम्यान प्रभाग १८ मधील विविध महत्त्वाच्या ठिकाणांसह अंतर्गत रस्ते व गल्ल्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये पालिका मैदान परिसर, देवाळे तलाव, महात्मा गांधी उद्यान परिसर, भुसार मोहल्ला, मांडावकर वाडा, जय भारत नाका परिसर, ठाणा नाका रोड तसेच वाल्मिकी नगर रोड या परिसरांचा समावेश होता.

         या मोहिमेत प्रभाग क्रमांक १४ ते २० मधील सुमारे २०० स्वच्छता दूत, पर्यवेक्षक तसेच घंटागाडी विभागातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून संपूर्ण प्रभागात एकाच वेळी स्वच्छता उपक्रम राबविण्यात आल्याने मोहिमेला अधिक वेग व परिणामकारकता प्राप्त झाली. साफसफाईबरोबरच विविध पूरक उपाययोजनांवरही विशेष भर देण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांमधील कचरा काढून पाणी निचरा सुरळीत राहावा यासाठी नाला साफसफाई करण्यात आली. तसेच नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. डासांच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी संपूर्ण परिसरात जंतुनाशक धूर फवारणी (फॉगिंग) करण्यात आली.या उपक्रमादरम्यान महापौर नितीन पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची पाहणी केली.

     “स्वच्छ पनवेल – सुंदर पनवेल” हे ध्येय साकार करण्यासाठी नागरिकांनीही स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Comments

बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026
रोडपालीतील रस्ता बंद, डम्पिंग ग्राउंड व नागरी समस्यांविरोधात ३० जूनला पनवेल महापालिकेवर भव्य मोर्चा
21 Jun 2026
तळोजा गुन्हे प्रकटीकरण पथकाची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस
19 Jun 2026
नैना क्षेत्रातील ९५ गावांचे अभिलेख पनवेलकडे परत करण्याचे आदेश; हस्तांतरण प्रक्रिया मात्र प्रलंबित
17 Jun 2026
अश्विन मुद्गल सिडकोचे नवे एमडी; विजय सिंघल यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पात बदली
16 Jun 2026