प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आमदार प्रशांत यांनी सिडको अधिकाऱ्यांना विचारला जाब

🕒 06-05-2026 02:18 PM | Prabhat Parv News

बेलापूर : स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची सिडको दफतरी कामे वेळेत होत नसल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज बेलापूर येथील सिडको भवनात सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीत स्थानिक शेतकरी व व्यावसायिकांना दफतरी दिरंगाई तसेच काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे होत असलेल्या त्रासाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.

      महाराष्ट्र शासन एज्युसिटी, एरोसिटी, लॉजिस्टिक पार्क, नैना आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोमार्फत उभारण्याच्या तयारीत आहे. मात्र, यापूर्वी ज्या शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला जमिनी दिल्या, त्यांना मोबदला आणि पुनर्वसनासाठी काही अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब किरण पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर तसेच सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे जमीन देण्यास प्रकल्पग्रस्त इच्छुक नसून , काही अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे सिडकोच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे अशा तक्रारींना वाव मिळू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील तसेच पुढील आठवड्यात या विषयावर धोरणात्मक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सिडकोच्या जेएमडी यांनी प्रशांत ठाकूर यांना दिले. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment

Comments

शिंपल्यांचा चुना आणि खनिजांचा चुना यांविषयीचे धर्मशास्त्रीय शंकासमाधान !
05 Oct 2026
पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व
26 Sep 2026
शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी पनवेलमध्ये ‘शाळा वाचवा’चा नारा
21 Sep 2026
खारघरकरांसाठी शासकीय वैद्यकीय योजनांबाबत मार्गदर्शन
21 Sep 2026
वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन
16 Sep 2026
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
13 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
शिवसेना शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण; आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित
01 Sep 2026