प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नांसाठी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे एमडी विजय सिंघल यांच्यासोबत बैठक

🕒 20-05-2026 05:46 PM | Prabhat Parv News

सीबीडी-बेलापूर : नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी सिडको भवन येथे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

         नवी मुंबई शहर उभारणीसाठी ठाणे, उरण आणि पनवेल तालुक्यातील ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या जमिनींच्या बदल्यात प्रलंबित असलेले प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या घरांचे नियमितीकरण, १२.५ टक्के योजनेतील भूखंड, रोजगारातील प्राधान्य, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, वाढीव मोबदल्याची वसुली पद्धत, बांधकाम कालमर्यादा शिथिल करणे आदी विषयांवर चर्चा झाली.

         सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांना प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याचे निर्देश दिल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. निवेदनात गरजेपोटी झालेल्या बांधकामांचे नियमितीकरण करण्यासाठी शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक सुविधांसाठी राखीव भूखंडांचे वाटप, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतर प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार व व्यवसायात प्राधान्य देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, बीएमटीसी कामगारांना गाळे वाटप सुरू करणे, तसेच प्रकल्पग्रस्त संस्थांवरील विविध शुल्क माफ करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

        याशिवाय १२.५ व २२.५ टक्के योजनेतील भूखंडांवरील बांधकाम कालमर्यादा शिथिल करणे, मत्स व्यवसायासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारणे, ‘समुद्रगर्क’ वर्गीकरणामुळे प्रलंबित असलेले भूखंड वाटप सुरू करणे आणि वाटप प्रक्रियेत अडकलेल्या भूखंडांचे संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली. या बैठकीला खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह सीए निलेश ज्ञानेश्वर पाटील, अतुल नंदकुमार म्हात्रे, सुधाकर पाटील, भूषण पाटील, संतोष पवार, ॲड. रोशन पाटील, सिडको युनियन अध्यक्ष संजय पाटील, मयूर तांडेल, अविनाश सुतार, हिमांशू पाटील, रवी मढवी यांच्यासह प्रकल्पग्रस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Comments

बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026
रोडपालीतील रस्ता बंद, डम्पिंग ग्राउंड व नागरी समस्यांविरोधात ३० जूनला पनवेल महापालिकेवर भव्य मोर्चा
21 Jun 2026
तळोजा गुन्हे प्रकटीकरण पथकाची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस
19 Jun 2026
नैना क्षेत्रातील ९५ गावांचे अभिलेख पनवेलकडे परत करण्याचे आदेश; हस्तांतरण प्रक्रिया मात्र प्रलंबित
17 Jun 2026
अश्विन मुद्गल सिडकोचे नवे एमडी; विजय सिंघल यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पात बदली
16 Jun 2026