अश्विन मुद्गल सिडकोचे नवे एमडी; विजय सिंघल यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पात बदली

🕒 16-06-2026 06:54 PM | Prabhat Parv News

नवी मुंबई : राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदावर आयएएस अधिकारी अश्विन मुद्गल यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश १६ जून रोजी जारी करण्यात आले.

           अश्विन मुद्गल हे सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त महानगर आयुक्त-२ म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी सिडकोचे विद्यमान उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) नियुक्ती करण्यात आली आहे. २००७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले अश्विन मुद्गल यांना शहरी विकास, पायाभूत सुविधा उभारणी, कंत्राट व्यवस्थापन तसेच इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. एमएमआरडीएमध्ये कार्यरत असताना त्यांनी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो रेल्वे प्रकल्प तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची जबाबदारी सांभाळली होती. सिडकोशी त्यांचा जुना संबंध असून यापूर्वी त्यांनी सिडकोमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे. त्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची प्रारंभिक कामे, नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे नियोजन, नैना क्षेत्रातील टाउन प्लॅनिंग स्कीम्सची अंमलबजावणी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामकाजात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

         सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना क्षेत्राचा विकास आणि इतर महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प निर्णायक टप्प्यावर आहेत. अश्विन मुद्गल यांच्या नियुक्तीमुळे या प्रकल्पांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा प्रशासकीय आणि विकास क्षेत्रातील वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सिडकोच्या आगामी विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीला नवे नेतृत्व मिळाले असून नवी मुंबई आणि नैना परिसरातील विकासकामांना चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

Comments

प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026