पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करावरील शास्ती लवकरच पूर्णपणे माफ करणार, दिलेला शब्द पाळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रभात पर्व न्यूज - Published: 01-Mar-2025 01:59 pm

मुंबई : पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये नवी मुंबई विमानतळाच्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू झाल्याने निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.  

     या विषयावर पुनरुज्जीवित चर्चा करण्यासाठी शिवसेना पनवेलच्या शिष्टमंडळाने २७ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्तागिरी निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात ॲड. प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश रानावडे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, उपमहानगरप्रमुख महेश सावंत, सचिन मोरे, प्रसाद सोनवणे, इम्तियाज शेख तसेच महिला पदाधिकारी डॉ. शिल्पा देशमुख, रीना पाटील, मंदा जंगले आणि यशोदा गायकवाड सहभागी होते.  

       या भेटीत पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करावरील शास्तीचा फटका बसत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत आवश्यक निर्णय प्रक्रियेची तातडीने सुरुवात करण्याचे आदेश दिले. राज्यातील इतर काही महापालिकांमध्येही अशी सवलत देण्याच्या प्रक्रियेत पनवेलला अग्रक्रम दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

          शिवसेनेच्या वतीने मंगेश रानवडे यांनी यासंबंधीचे निवेदन एकनाथ शिंदे यांना सादर केले. यापूर्वीही मंगेश रानवडे व इतर शिवसेना पदाधिकारी यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, लवकरच यावर सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे संकेत मिळत आहेत.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement