तळोज्यातून १५ वर्षीय मुलगा बेपत्ता, शोधासाठी पोलिसांचा तपास सुरू

प्रभात पर्व न्यूज - Published: 06-Feb-2025 06:28 pm

तळोजा : तळोजा वसाहतीमधील फेज-१, सेक्टर-१० येथील १५ वर्षीय मुलगा मुसद्दिक मुख्तार अन्सारी काल (बुधवार, ५ फेब्रुवारी) रात्री ८:४५ च्या सुमारास घरातून निघून गेला असून अद्याप परतलेला नाही.  

       पोलिसांनी तसेच कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुसद्दिकची उंची ५ फूट ४ इंच असून तो गोऱ्या रंगाचा, गोल चेहऱ्याचा आहे. त्याचे केस आणि डोळे काळ्या रंगाचे आहेत. घरातून निघताना त्याने ग्रे टी-शर्ट, काळ्या रंगाची पँट घातली होती आणि पायात चप्पल घालून गेला होता. तो हिंदी भाषा बोलतो.  

          मुसद्दिक ट्युशनला का गेला नाही, अशी विचारणा त्याच्या आईने केली असता, तो रागाच्या भरात घरातून निघून गेला. त्याने एका बॅगेत कपडे भरले होते, अशी माहिती वडील मुख्तार अन्सारी यांनी दिली आहे. 

         कुटुंबियांनी तातडीने तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस मुलाचा शोध घेत आहेत. नागरिकांनी मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ मुख्तार अन्सारी (मो. 9987751588) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement