उरण येथे जलतरण स्पर्धेत ६ वर्षांखालील गटामध्ये अन्विका निंबाळकरची शानदार कामगिरी
प्रभात पर्व न्यूज - Published: 27-Jan-2025 09:12 pm
उरण : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विजय विकास सामाजिक संस्थेच्या वतीने २६ जानेवारी २०२५ रोजी उरण येथे रायगड जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कु. अन्विका निंबाळकर हिने ६ वर्षांखालील गटामध्ये अप्रतिम कामगिरी करून आपले कौशल्य सिद्ध केले.
अन्विकाने २५ मीटर फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय आणि ब्रेस्ट स्ट्रोक या चारही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत सर्व स्पर्धकांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. तिच्या या कामगिरीबद्दल तिला चार सुवर्ण पदके (गोल्ड मेडल) तसेच चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. अन्विकाच्या या यशामागे कर्नाळा स्पोर्ट अकादमी, पनवेलचे प्रशिक्षक श्री. समर्थ नाईक यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या कामगिरीमुळे उरण शहरासह रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
