रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव यांचे निधन

प्रभात पर्व न्यूज - Published: 31-Dec-2024 03:45 pm

नवी मुंबई : नवी मुंबईतील खैरणे गावाचे भूमिपुत्र व रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव यांचे रविवारी (दिनांक २९ डिसेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.  

      नंदकुमार भालेराव हे मनमिळावू स्वभावाचे आणि आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले कार्यकर्ते होते. रिपब्लिकन सेनेत काम करताना त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लढा दिला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुले, असा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव जय भालेराव हे सध्या प्रभात पर्व न्यूज या वृत्तवाहिनीचे नवी मुंबई प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.  

           नंदकुमार भालेराव यांचा अंत्यविधी सोमवारी (३० डिसेंबर)  खैरणे येथील स्मशानभूमीत करण्यात आला. या वेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी राज्य उपाध्यक्ष खाजा पटेल आणि नवी मुंबईतील अनेक आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.  नंदकुमार भालेराव यांचे कार्य आणि त्यांची सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांचे नाव कायम स्मरणात राहील, अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement