तळोजे मजकूर येथील रिक्षा चालक कृष्णा जाधव यांची प्रामाणिकता; प्रवाशाची हरवलेली बॅग परत

प्रभात पर्व न्यूज - Published: 12-Nov-2024 10:26 am

तळोजा : तळोजे मजकूर येथील रिक्षा चालक कृष्णा महादू जाधव (कल्याणकारी रिक्षा संघटना तळोजा) यांनी प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी, तळोजे फेज १ येथील स्टार प्लॅनेट हॉटेलहून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची बॅग त्यांच्याकडेच रिक्षात विसरली गेली होती. 

 

रिक्षात प्रवाशाची बॅग सापडताच कृष्णा जाधव यांनी त्वरित तळोजा फेज-१ येथील पोलीस चौकी गाठली. त्यांनी पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र ओंबासे यांच्याकडे बॅग सुपूर्त करत, बॅगच्या तपासणीची विनंती केली. तपासणीत बॅगमध्ये महत्त्वाचे दस्तऐवज, सोन्याची अंगठी, मोबाईल आणि रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले.

पोलीस अधिकारी श्री. ओंबासे यांनी प्रवाशाशी संपर्क साधून त्यांना तळोजे फेज -१ येथील पोलीस चौकीवर बोलावले. प्रवाशाला त्यांची बॅग आणि सर्व मौल्यवान वस्तू सहानिशा करून परत करण्यात आली. संबंधित महिला प्रवाशांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कृष्णा जाधव यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले व आभार मानले.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement