बेवारस इसमाच्या मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे तळोजा पोलिसांचे आवाहन
प्रभात पर्व न्यूज - Published: 02-Oct-2024 01:37 pm
तळोजा : २ जून २०२४ रोजी दुपारी बाराच्या सुमारास तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एल.एन.टी. कंपनीच्या कंस्ट्रक्शन साईटवरील गेट क्र.०५ समोर एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. सदर इसमाची अवस्था पाहून त्या इसमाला तात्काळ उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांकडून संबंधित इसमाला उपचारापूर्वीच मयत घोषित करण्यात आले.
तळोजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे ४० ते ४५ या इसमाची उंची अंदाजे ५ फुट ४ इंच, चेहऱ्यावर छोटी दाढी, अंगाने सडपातळ डोक्याचे केस काळे पांढरे, चेहरा उभट आहे. तसेच अंगात निळया व पांढ-या रंगाचा चौकडा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू असून काही माहिती मिळाल्यास ०२२-२७४१२३३३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन तळोजा पोलीसांनी केले आहे.