महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 'तळोजा डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या' वतीने शांततापूर्ण निषेध रॅली

प्रभात पर्व न्यूज - Published: 21-Aug-2024 09:45 am

तळोजा : कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ, मंगळवारी तळोजा डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शांततापूर्ण निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने डॉक्टरांनी सहभाग नोंदवला, ज्यामध्ये महिला डॉक्टरांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.

          यावेळी महिला डॉक्टरांनी आपले विचार मांडताना सांगितले की, "सुशिक्षित महिलांना उदरनिर्वाहासाठी शिक्षण घेऊन कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत आम्हाला, डॉक्टर म्हणून 24 तास काम करावे लागते. मात्र, महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आजपर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना सरकारकडून राबवल्या जात नाहीत. कलकत्त्यातील घटनेमुळे आम्ही अत्यंत अस्वस्थ आहोत आणि म्हणूनच या रॅलीचे आयोजन केले आहे. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, कलकत्ता हत्याकांड प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी आणि महिला सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना तातडीने राबवाव्यात."

     रॅलीत सहभागी झालेल्या डॉक्टरांनीही स्पष्ट केले की, "सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यासाठी आम्ही ही शांततापूर्ण रॅली आयोजित केली आहे."


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement