रायगड एसटी प्रेमी ग्रुप तर्फे पेण आगारातील चालक-वाहक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
प्रभात पर्व न्यूज - Published: 17-Aug-2024 03:39 pmपेण : रायगड विभागातील पेण आगार नेहमीच एक महत्त्वाचा आगार म्हणून भूषविला जातो. चालक वाहक नेहमीच उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करित असतात. तसेच पेण आगाराचा पसारा देखील भरपूर मोठा आहे. लांब पल्ला मध्यम लांब पल्ला तसेच तालुक्यातील खेड्या पाड्यात आगारामार्फत ग्रामीण मार्ग चालविले जातात. याच पेण आगारातील चालक वाहकांना उत्तमोत्तम कामगिरी बजावण्यासाठी प्रेरणा मिळावी व सेवेत अधिकाधिक सुधार व्हावेत या हेतूने रायगड एसटी प्रेमी ग्रुप तर्फे उत्कृष्ट चालक व उत्कृष्ट वाहक अशी महत्वाकांक्षी स्पर्धा माहे जुलै २०२४ मध्ये राबविण्यात आली.
या स्पर्धेत माहे जुलै २०२४ मध्ये उत्तम कामगिरी बजावून उत्कृष्ट उत्पन्न आणणारे वाहक विशाल भोईर यांनी प्रथम तर श्रीमती प्रियांका घार्गे यांनी द्वितीय क्रमांक. मिळवला, तर श्रीमती भक्ती म्हात्रे व श्रीमती रेश्मा म्हात्रे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वाहन चालविण्याचे उत्तम कौशल्य दाखवून कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त किमी चालवून उत्कृष्ट चालक म्हणून मोहन कांदे यांनी प्रथम तर द्वितीय क्रमांक विनोद म्हात्रे तर तृतीय क्रमांक गोविंद मुचवाड यांनी पटकावला. तसेच आणखी उत्तेजनार्थ कामगारांचा देखील सत्कार करण्यात आला.
पेण आगारात एकूण ५८ बसेस असून त्यापैकी ५५ बसेस सी एन जी इंधन प्रणालीवर चालत असून ३ बसेस या डिझेल इंधनावर चालविण्यात येत आहेत. आगारात बसेस कमी असून देखील आगार व्यवस्थापिका श्रीमती अपर्णा वर्तक व कर्मचारी वृंद एसटी चा उत्पन्न वाढीसाठी व तालुक्यातील लोकांना उत्तम सुविधा मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
याप्रसंगी पेण आगाराच्या आगार व्यवस्थापिका अपर्णा वर्तक, वाहतूक निरीक्षक आलोक गायकवाड व कार्यशाळा अधीक्षक अनिल पाटील उपस्थित होते तसेच, आम्ही रायगडकर लालपरी प्रेमी ग्रुपचे कौस्तुभ मोकल, सिद्धार्थ खंडेराव, ओमकार म्हात्रे, प्रथमेश वर्तक. तसेच MSRTC Lovers Group चे मयुरेश खरात व ललित भोजने उपस्थित होते.