तळोजे मजकूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्यावाटप

प्रभात पर्व न्यूज - Published: 07-Aug-2024 09:25 pm

तळोजा : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून तळोजे मजकूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्यावाटप करण्यात आले. तसेच तळोजे मजकूरचे ग्रामस्थ असलेले सामाजिक कार्यकर्ते सोपान पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांना दफ्तरे आणि लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपाचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, तळोजे मजकूर येथील भाजपाचे युवा नेते संतोष पाटील, बूथ अध्यक्ष दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते सोपान पाटील, सिध्दी करवले येथील भाजपचे रमेश मढवी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

         छोटेखानी स्वागत समारंभानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते २०० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तळोजे मजकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान पाटील यांचा ४५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सन २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षातील वार्षिक परीक्षेमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना दप्तरे तसेच लेखन साहित्य देण्यात आले.

     प्रल्हाद केणी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांकडून घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. शाळेचा पट चांगला असल्याने शाळेविषयी समाधान व्यक्त केले. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा कोतवाल यांनी सर्वांचे आभार मानले आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हातून असेच समाजकार्य घडत राहो, ही सदिच्छा व्यक्त केली.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement