किरण राणे यांना वाणिज्य विषयात पीएचडी
प्रभात पर्व न्यूज - Published: 07-Aug-2024 02:02 pm
नवी मुंबई : किरण श्रीकांत राणे यांनी वाणिज्य विषयात संशोधन करून पीएचडी पूर्ण केली आहे. मुंबईतील एमएसएमई (MSME) मधील डिजिटल मार्केटिंग तंत्रज्ञान वापर यावर संशोधन करून त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे मार्गदर्शक डॉ. अंकुर सोनी आणि सह मार्गदर्शक डॉ. जी. एस. परमार यांच्या मार्गदर्शनाखाली ओपीजीएस विद्यापीठातून त्यांनी हे संशोधन पूर्ण केले आहे.
शिक्षण क्षेत्रात दांडगा अनुभव असलेल्या किरण राणे सध्या आयटीएम कौशल्य विद्यापीठ, नवी मुंबई येथे कुलसचिव पदावर कार्यरत आहेत. प्रगती फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते समाजकार्यात देखील सहभागी होत असतात. सामान्य कुटुंबातून आलेल्या किरण राणे यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.