शिवरायांचे युद्ध स्मारकाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीमध्ये शिवव्याख्याते विवेक भोपी यांची नियुक्ती

प्रभात पर्व न्यूज - Published: 31-Jul-2024 02:12 pm

मुंबई : मौजे उंबरखिंड (विजयभूमी), ता.खालापूर, जि.रायगड येथे "छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धस्मारक" बांधकामाकरिता शिफारस करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जिल्हास्तरीय समीती स्थापन करण्यात आली असून त्या समितीमध्ये शिवचरित्र अभ्यासक म्हणून शिवव्याख्याते ॲड.विवेक परशुराम भोपी यांची नेमणूक करण्यात आली आहे. पनवेलमधील नितळस गावच्या एका युवकाची महाराष्ट्र सरकारच्या एवढ्या महत्वाच्या समितीमध्ये स्थान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

               सदर समितीची बैठक मंगळवारी (३० जुलै) रोजी रायगड जिल्हा पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही बैठक संपन्न झाली कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर, तसेच रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह संबंधित सरकारी अधिकारी उपस्थित होते.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement