तळोजा एमआयडीसीमध्ये साचत असलेल्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू

प्रभात पर्व न्यूज - Published: 24-Jul-2024 05:22 pm

तळोजा : सततच्या मुसळधार पावसामुळे तळोजा एमआयडीसीच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, ज्यामुळे उद्योजकांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात उद्योजकांनी तक्रारी केल्यानंतर, तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (TMA) एमआयडीसी प्रशासन आणि उद्योजकांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एमआयडीसी प्रशासनाने पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आणि दहा दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते.

‌     या संदर्भात एमआयडीसी प्रशासनाने पाणी साचण्याच्या कारणांची तपासणी आणि उपाययोजना सुरू केल्या आहेत. तुंबलेली गटारे आणि बुजलेले नाले यांची साफसफाई करण्याचे काम जोरात सुरू आहे, ज्यामुळे तळोजा एमआयडीसी परिसरात पाणी साचण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. TMA कडून एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असून, ही समस्या लवकरात लवकर कायमस्वरुपी मार्गी लागेल असा विश्वास TMA चे अध्यक्ष शेखर शृंगारे यांनी व्यक्त केला आहे.

 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement